ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 03 March 2025
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 03 March 2025
महत्वाची बातमी...
बीड आणि परभणीच्या मुद्द्यावर भेटण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे भेट मागत आहे, पण दोन आठवडे झाले तरी ते वेळ देत नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. वाल्मिक कराडला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कुणी केले? असा प्रश्न त्यांनी केला. तुम्ही पीए आणि ओएसडीबाबत एवढी कडक भूमिका घेता, मग धनंजय मुंडेंवर एवढे आरोप असताना त्यांच्याबाबत वेगळी भूमिका का? असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला. मुख्यमंत्र्यांनी जसा पीएस आणि ओएसडींच्या नियुक्तीबाबत चाप लावला आहे तसा चाप त्यांच्या मंत्र्यांनाही लावला पाहिजे असं सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,"गेले दोन आठवडे मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागत आहे. या सगळ्या गोष्टीसाठी राजकारण बाजूला ठेवून मी वेळ मागत आहे. बीड, परभणीला जाऊन आल्यापासून वेळ मागत आहेत. मला पाच मिनिट वेळ हवा आहे पण तरीही वेळ मिळत नाही."
दोन-चार लोकांमुळे बीडची बदनामी
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "कृष्णा आंधळे गायब कसा झाला असा प्रश्न विचारत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीड जिल्ह्याची बदनामी दोन चार लोकांमुळे होत आहे. राज्यात नव्हे तर देशात बदनामी होत आहे. व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बातम्या मी बघितल्या आहेत, मात्र एक खून माफ आहे असं दिसतंय."