
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 19 February 2024
किल्ले शिवनेरीवर दिमाखदार शासकीय शिवजयंती सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शिवरायांना मानवंदना
मुंबईत राज्यपाल राधाकृष्णन यांची शिवरायांना मानवंदना.. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच शिवजयंतीचा उत्साह.. पाळणा जोजावून शिवजन्मोत्सव साजरा..
ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय, सर्व नेत्यांची शिवसेना भवनात दर मंगळवारी होणार आढावा बैठक, नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस
शिवरायांचे किल्ले सरकारसाठी मंदिरापेक्षा श्रेष्ठ, शिवनेरीवरील जन्मोत्सवात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य.. गडकिल्ल्याचं जतन करण्यासाठी विशेष टास्क फोर्स, मुख्यमंत्र्यांची माहिती.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सायंकाळी आग्रा किल्ल्यावर खास शिवजयंती उत्सव.. अभिनेता विकी कौशलचीही शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती
राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतीच्या नव्या पुतळ्यांची आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी, शिवजयंतीनिमित्त मालवण शहरातून राजकोट किल्ल्यापर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा