ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 16 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 16 April 2025
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर दीड तास भेट, स्नेहभोजनासह बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया. सदिच्छा भेट असल्याची शिंदेंची माहिती.
ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा, एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आवाजात भाषण तर विविध विषयांवर सखोल चिंतन आणि चर्चा
नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्राविरोधात काँग्रेसची आज देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने..चार्जशीटमध्ये सोनिया गांधी आरोपी क्रमांक एक तर राहुल आरोपी क्रमांक दोन
काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांची आजही ईडी चौकशी करणार, हरियाणातील शिकोहपूर जमीन घोटाळ्याप्रकरणी काल ६ तास कसून चौकशी
दीनानाथ मंगेशकर गर्भवती मृत्यू प्रकरण, भिसे कुटुंबीयांकडून आरोप करण्यात आलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा, घैसास यांची चूक नसल्याचं मेडिकल असोसिएशन मत
नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवल्याप्रकरणी मनपा आयुक्तांनी कोर्टात बिनशर्त माफी, राज्य सरकारचं परिपत्रक नसल्याने कारवाई केल्याची कबुली