ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 February 2025

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 February 2025

पुणे बलात्कार प्रकरणातला आरोपी पकडायला उशीर झाला, पुणे पोलिसांची कबुली, पण आता वॉटरटाईट केस बनवण्याचा निर्धार...

पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अखेर अटक, शिरुरमधल्या गुणाट गावातून मध्यरात्री बेड्या, आरोपी लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत

आरोपी दत्तात्रट गाडेची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी, आज दुपारी २ वाजता पुणे सत्र न्यायालयात हजर करण्याची शक्यता..

पुणे बलात्कार प्रकरण सामान्य वाटत असेल तर मंत्र्‍यांना ठोकलं पाहिजे, योगेश कदम आणि संजय सावकारेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप...दोघांचेही राजीनामे घेण्याची मागणी..

ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज मातोश्रीवर बैठक, पक्ष मजबुती आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा होणार.

राज्याच्या अर्थसंकल्पातील ४३ टक्के निधीचाच वापर, गेल्या पाच वर्षातला खर्चाचा निचांक, लाडकी बहीण योजनेचा खर्चाला हातभार

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल, अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती, नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola