ABP Majha Marathi News Headlines maharshtra poltics Vidhansabha 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 1PM दुपारी १ च्या हेडलाईन्स- TOP Headlines 1PM 28 October 2024

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भव्य शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज, दादा आठव्यांदा बारामतीतून विधानसभेच्या रिंगणात..

शक्तिप्रदर्शनाला फाटा देत युगेंद्र पवारांनी भरला शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज, सुप्रिया सुळेही होत्या सक्रीय..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाजतगाजत निघाले अर्ज भरायला, देवेंद्र फडणवीसांचीही मिरवणुकीत हजेरी..शक्तीप्रदर्शनापूर्वी अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन...

हसन मुश्रीफांनी गोमातेची पूजा करुन भरला उमेदवारी अर्ज, निलेश आणि नितेशचा अर्ज भरताना नारायण राणे आवर्जुन हजर...

अमित ठाकरेंचा उत्सवासारखा उमेदवारी अर्ज दाखल, राज ठाकरेंचीही हजेरी..संदीप देशपांडेंचाही भव्य मिरवणूक काढून आदित्य ठाकरेंविरुद्ध अर्ज

पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गटाला फक्त १ जागा, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला एकच जागा देत नाना पटोलेंची सरशी तर कोकणात शिवसेनेकडून काँग्रेस हद्दपार


आमदार देवेंद्र भुयारांना वरुड-मोर्शी मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, भुयारांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram