ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 22 March 2025

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 22 March 2025

नागपूर हिंसाचारात दंगेखोरांकडून नुकसानीची वसुली, नुकसान भरलं नाही तर संपत्ती करणार जप्त, मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा...तर नुकसान झालेल्यांना ३ ते ४ दिवसांत मिळणार भरपाई...

आदित्य ठाकरेंचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल...नागपूरमधला हिंसाचार फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी, माझा व्हिजनमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला होता संशय...

काँग्रेसच्या सत्यशोधन समितीकडून नागपूर हिंसाचाराचा आढावा...कुराणातील आयत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी...तर हे निव्वळ लांगुलचालन, मुख्यमंत्र्यांचा पलटवार...

नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, जखमी इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...

प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडून जप्त, दुबईचा फोटो मीडियात व्हायरल झाल्यावर कारवाई, लूकआऊट सर्क्युलर जारी...तर कोरटकरला कुठूनही शोधून काढणारच, फडणवीसांचा निर्धार

दिशाप्रकरणी उद्धव यांनी दोनदा फोन करत आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली, नारायण राणेंचा दावा..तसंच पूर्वी दंगलींचं प्लॅनिंग मातोश्रीवर होत असे, नितेश राणेंचा नवा आरोप...तर कचऱ्यावर लक्ष देत नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार

वसंतदादा शुगर इन्स्टियूटच्या बैठकीसाठी पोहोचताना शरद पवार आणि अजितदादांची नजरानजर, हातवारे, तर जयंत पाटलांची दादांसोबत बंद दाराआड चर्चा

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola