ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 13 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 13 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
केजरीवालांना देशद्रोही ठरवून प्रचार करणं काँग्रेसला शोभत नाही, सामनातून निशाणा, भाजपच्या माफियाशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ गरजेची, सामनाकारांचा सल्ला
अधिसूचना रद्द केलेल्या शक्तिपीठ हायवेसाठी पुन्हा हालचाली, शेतकऱ्यांचा विरोध असलेली ठिकाणं वगळून प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न
विकासकामं जून-जुलैमध्ये तर टेंडर ऑगस्टमध्ये, नागपुरात झेडपीच्या कार्यतत्परतेचा अजब नमुना, सीईओकडून भ्रष्टअधिकाऱ्याची पाठराखण
मुंबई महापालिकेच्या २७ रुग्णालयांना आजपासून औषध पुरवठा बंद करण्याचा पुरवठादारांचा इशारा, १२० कोटींची थकवल्याने पुरवठादारांचा निर्णय
परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू, चालकाला अटक, अपघात की घातपात, तपास सुरु...
संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय आज मस्साजोगमध्ये टॉवरवर चढून आंदोलन करणार, वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करण्याची मागणी