ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024

Continues below advertisement

राजेंद्र मुळक, जयश्री पाटील, आबा बागुल यांच्यासह काँग्रेसच्या पाच बंडखोरांवर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई, भाजपनंतर काँग्रेसही झाली कठोर
मुंडे बहीणभावाने धाक दाखवत कोट्यवधींची जमीन मातीमोल किंमतीत लाटली.. सारंगी महाजनांचा पंकजा आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
एकीची गरज हिंदूंना नाही तर फक्त भाजपलाच, योगी आदित्यनाथांच्या 'बटेेंगे तो कटेंगे' घोषणेला उद्धव ठाकरेंकडून उत्तर
कोळीवाड्यांच्या क्लस्टर विकासाचा आणि धारावीचा जीआर रद्द करणार, ठाकरे गटाचा वचननामा प्रकाशित, जातनिहाय जनगणना आणि मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षणाचं आश्वासन..
निवडणुकीच्या धामधुमीत वरळीमध्ये ठाकरे गटाचा शिंदे गटाला धक्का...तीन शाखाप्रमुख ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये परत..
राज ठाकरे दुपारपर्यंत झोपेतच राहतात, येड्यांना कळतं, तुम्ही तर शहाणे, मनोज जरांगेंचा हल्लाबोल......
सदाभाऊंच्या पवारांवरील वक्तव्यानंतर युती आणि आघाडीच्या नेत्यांची कुत्र्यावरुन लाखोली, एकमेकांना कुत्र्यांची उपमा देत टीका..
चिंचवड मतदारसंघांच्या हद्दीत ३५ लाखांची रोकड जप्त, रक्कम कुणाची, कुठून कुठे नेली जात होती याचा तपास सुरु
नोकरभरतीची प्रक्रिया एकदा सुरु झाली की नियम बदलता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल, बदल करायचे तर जाहिरात देतानाच नमूद करण्याच्या सूचना..
सलमान खानपाठोपाठ आता शाहरूख खानलाही धमकी, वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी फैजानला रायपूरमधून बेड्या..
जेट एअरवेज अवसायनात काढण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, कंपनीची मालमत्ता विकून कर्जदारांची देणी देणार, दिवाळखोरीतून बाहेर काढण्याचा प्रस्ताव कोर्टाने फेटाळला...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram