ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07AM : 31 August 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07AM : 31 August 2024 : Maharashtra News
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा...शिवरायांसमोर नतमस्तक होऊन माफी मागतो, वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदींचं जाहीर वक्तव्य...
पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्र माफ करणार नाही, मोदींच्या माफीवर विरोधकांची प्रतिक्रिया...माफीला उशीर झाल्याची टीका... 
पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन..२०१९मधील सरकारनं बंदराला विरोध केला, नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा
राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्या नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन...समितीत इतिहासकार जयसिंगराव पवार विशेष निमंत्रित सदस्य...
भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी रावसाहेब दानवेंच्या खांद्यावर संयोजनाची जबाबदारी....कोअर कमिटीच्या बैठकीनंतर बानकुळेंची माहिती
एक अधिकारी चुकला म्हणून संपूर्ण पोलीस दलाला दोष देणं योग्य नाही..तर मुंबई पोलीस महिलांवरील अत्याचाराचा तपास गांभीर्यानंच करतात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांचं हायकोर्टात हमीपत्र 
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर नागपुरात आशा सेविका बहिष्कार टाकण्याच्या तयारीत... मेळाव्यासाठी जबरदस्ती केली जात असल्यानं नाराजीचा सूर 
मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई -गोवा महामार्गावरील कंत्राटदारांची रस्ते दुरुस्तीसाठी तारांबळ ... नागोठणे ते कोलाड परिसरात दिवस रात्र खड्डे बुजवण्याचं काम सुरू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram