ABP Majha Headlines : सकाळी 7 च्या हेडलाईन्स : 09 Aug 2024 : ABP Majha Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : सकाळी 7 च्या हेडलाईन्स :  09 Aug 2024 : ABP Majha Marathi News
ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू निरज चोप्राला रौप्यपदक, दुसऱ्या प्रयत्नात फेकला  ८९.४५ मीटर्स लांब भाला, निरजचा यशाचं देशभरातून कौतुक.  
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने जिंकलं कांस्य पदक, स्पेनविरुद्धच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतसिंगचे दोन गोल ठरले निर्णायक 
रौप्य पदकासाठी विनेश फोगटच्या स्पोर्ट्स कोर्टातल्या अपीलावर आज सुनावणी...ऑलिम्पिकमधून अपात्रतेनंतर विनेशने केला होता अर्ज
भारताचा पैलवान अमन सेहरावतला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची संधी, प्युर्तो रिकोच्या डॅरियन क्रूझशी आज होणार कांस्यपदकासाठी सामना.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने ठोकला शड्डू, महायुतीचे समन्वय मेळावे, संवाद दौऱ्यांचं होणार आयोजन, २० ऑगस्टपासून सातही विभागात दौरे
देशात हिंदूंची संख्या कमी झाली तर लोकशाही टिकणार  नाही, विश्व हिंदू परिषदेच्या गोविंद शेंडे यांचं वक्तव्य
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आजपासून शिवस्वराज्य यात्रा, पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी लढत असलेल्या ३१ मतदारसंघात यात्रा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस, आमदार दिलीप बनकरांच्या निफाड मतदारसंघात अजितदादांचा दौरा, शेतकरी मेळाव्यालाही राहणार उपस्थित

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram