ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines : 21 February 2024
ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines : 21 February 2024
मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण
स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण नको, ओबीसीतूनच आरक्षण द्या, जरांगेंची कडाडून टीका, मंजूर झालेलं मराठा आरक्षण बहुसंख्यांसाठी फायदेशीर नाही, जरांगेंची टीका
मुंबईत भाजपच्या कार्यक्रमात मनसे नेत्यांची हजेरी..बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई मंचावर उपस्थित तर आगामी काळात युती झाल्यास काहीच अडचणीचं नाही, बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य
शरद पवारांनी कोल्हापुरात घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट, उमेदवारीवर पवारांचा सस्पेन्स कायम, शाहू महाराजांना उमेदवारी मिळाल्यास आनंदच, पवारांचं वक्तव्य
लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा, भाजपला ३२, शिवसेना १२ तर राष्ट्रवादीच्या वाटेला ४ जागा , सुत्रांची माहिती
पुण्यात ११०० कोटींहून अधिक किंमतींचे ड्रग्स जप्त, विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेची कारवाई, तिघांना बेड्या, तर दिल्लीतही पुणे पोलिसांची कारवाई, ४०० किलो एमडी ड्रग्ज जप्त