ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025
सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारा रिक्षाचालक माझावर...हॉस्पिटलमध्ये नेताना सैफची अवस्था कशी होती केलं सविस्तर वर्णन...
सैफ अली खानवरच्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी तब्बल ३५ टीम तयार...मुंबई पोलिसांच्या २० टीम, तर क्राईम ब्रँचच्या १५ टीम करणार तपास...
हल्ल्यानंतर सैफच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर, सैफच्या पाठीचं ऑपरेशन करून काढला चाकूचा अंदाजे अडीच इंचाचा तुकडा
सैफ अली खाननं हल्ल्यावेळी दाखवलेल्या धाडसाचं लीलावतीच्या डॉक्टरांकडूनही कौतुक, रक्तबंबाळ अवस्थेत एखाद्या घायाळ सिंहासारखा तैमूरला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्याची डॉक्टरांनी दिली माहिती..
अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यातही झाला होता घुसखोरीचा प्रयत्न, सैफ आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांना संशय
वाल्मिक कराडचे दुसऱ्या पत्नीच्या नावाने पुण्यामध्ये आणखी तीन फ्लॅट, एबीपी माझाच्या इनवेस्टीगेशनमध्ये माहिती समोर, हडपसरच्या ऍमनोरामध्ये दोन आणि खडकीला एक फ्लॅट...
गोळीबार आणि दुहेरी हत्येने बीड जिल्हा हादरला, आष्टीमध्ये जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या तर अंबाजोगाईत जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार
बारामती तालुक्यात वडिलांनीच केली ९ वर्षांच्या मुलाची भिंतीवर डोकं आपटून हत्या, अभ्यास करत नसल्याच्या रागातून खून, पोलिसांनी अंत्यविधी थांबवून केली उत्तरीय तपासणी..
मालेगावात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बेकायदेशीर नागरितत्व दिल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप...सोमय्यांनी दिली तहसीलदारांना भेट...काही सरकारी अधिकारीच सहभागी असल्याचा आरोप...
पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यातल्या दिरंगाईची होणार चौकशी, एबीपी माझाच्या बातमीची महसूलमंत्र्यांनी घेतली दखल, आजच बैठक घेऊन दोषींवर करणार कारवाई..