ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025

Continues below advertisement

अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरात घुसून चाकूहल्ला, लिलावतीमध्ये सर्जरीनंतर पाठीत रुतलेलं तीक्ष्ण शस्त्र काढण्यात डॉक्टरांना यश

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफवर दोन शस्त्रक्रिया, पाठीच्या कण्याला गंभीर जखम मात्र प्रकृती स्थिर, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता...

शेजारील इमारतीमधून उडी मारून हल्लेखोरानं एन्ट्री केल्याचा संशय, सीसीटीव्हीत हालाचाली चित्रित झाल्याची सूत्रांची माहिती

सैफच्या हल्ल्यानंतर क्राईम ब्रँच सक्रिय, फोरेन्सिककडून सर्व लहान-सहान पुराव्यांची पडताळणी, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकही हल्लेखोराच्या तपासात अॅक्टिव

सीसीटीव्ही फूटेजच्या पडताळणीत पोलिसांना आढळले दोन संशयित, दोन संशयितापैकी एक हल्लेखोर असण्याची शक्यता, दोन्ही संशयिताचा शोध युद्धपातळीवर 

सैफवर हल्ला, विरोधकाचं कायदा-सुव्यवस्थेवर बोट! सिद्दीकींच्या हत्येनंतरही सरकारला सेलिब्रिटींच्या सुरक्षेचं गांभीर्य नसल्याचा शरद पवारांचा आरोप 


हल्ल्यात जखमी अभिनेत्याचं नाव खान असल्यामुळेच विरोधकांकडून राजकारण, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गंभीर आरोप, सेलिब्रिटींसाठी मुंबई आजही सुरक्षित असल्याचा दावा 


विधान परिषद आमदार अपात्रतेची आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी दोन महिन्यांनंतर, नव्या सभापतींच्या सुनावणीचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून स्वागत

बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनासाठी पवार फॅमिली एकत्र, पण काका-पुतण्याच्या खुर्चीत अंतर. नणंद-भावजय मात्र एकमेकांच्या शेजारी

धनंजय मुंडेंची परळीत जगमित्र कार्यालयातून कामाला सुरूवात, सर्वसामान्यांच्या भेटीगाठी, वैजनाथ मंदिरात केलं पूजन

छत्रपती संभाजीनगरमध्ये बीसीएसच्या विद्यार्थ्याचा राहत्या फ्लॅटमध्ये गळा चिरुन खून, कॉलेजमधल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय

इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा.. अंतराळस्थानकासाठी महत्वाच्या स्पॅडेक्सचं अवकाशातील डॉकिंग यशस्वी..   अंतराळात डॉकिंग सज्ज असणारा भारत जगातला चौथा देश 

अदानी उद्योगसमूहावर संक्रांत आणणारी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय, संस्थेचा उद्देश साध्य झाल्यानं निर्णय घेतल्याची  संस्थापक नाथन अँडरसन यांची माहिती.. अदानीच्या शेअर्समध्ये उसळी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram