ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 31 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 31 August 2024

ही बातमी पण वाचा

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा होणार खोळंबा, 10 तासांच्या मेगा ब्लॉकनंतर मालाड स्थानकात होणार 4 मोठे बदल

मुंबई :  पश्चिम रेल्वेवरील (Western Railway)  मालाड (Malad)  हे स्थानक अतिशय महत्त्वाचे असून त्या ठिकाणी सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी आज दहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक (Mega Block)  घेण्यात येत आहे. हा जम्बो मेगाब्लॉक गोरेगाव ते कांदिवली या स्थानकांच्या दरम्यान असेल. या मेगाब्लॉकमुळे आज रात्री दहा वाजल्यापासून ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेच्या लोकल या कांदिवली आणि गोरेगावच्या (Kandivali To Goregoan)  दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. मात्र हा मेगाब्लॉक पूर्ण झाल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल होणार आहेत. 

काय होणार बदल ? 

  • 1 सप्टेंबरपासून - सध्या फलाट क्रमांक 1 वरील विरार दिशेला जाणाऱ्या धीम्या लोकलमधील पश्चिम दिशेच्या दरवाजातून चढण्या-उतरण्याची सुविधा आहे. आता डब्यातील पूर्वेकडील दरवाजाचा चढण्या-उतरण्यासाठी वापर करावा लागणार आहे.
  • 8 सप्टेंबरपासून – चर्चगेट दिशेला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये चढण्या-उतरण्यासाठी पश्चिमेच्या दरवाजाचा वापर करावा लागणार आहे. 
  • 22सप्टेंबरपासून – विरार दिशेला जाणाऱ्या जलद लोकलच्या पूर्वेकडील दरवाजाचा चढण्या-उतरण्यासाठी वापर करावा लागेल.
  • 29 सप्टेंबरपासून -चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये चढण्या-उतरण्यासाठी पश्चिमेकडील दरवाजाचा वापर करावा लागणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram