ABP News

दुपारी 3 च्या हेडलाईन्स: ABP Majha Marathi News : Headlines 3 PM Headlines : 24 September 2024

Continues below advertisement

दुपारी 3 च्या हेडलाईन्स:  ABP Majha Marathi News : Headlines 3 PM Headlines : 24 September 2024
मुंब्रा बायपासवर एन्काऊंटरच्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीमकडून पुरावे जमवण्याचं काम सुरू...तर पोस्टमॉर्टमनंतर अक्षयचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवणार...
बदलापुरातील शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर, ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंकडून सवाल उपस्थित
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर करणाऱ्या पीआय शिंदेचीही कारकीर्द वादग्रस्त, राऊतांचा आरोप,मुंबईत सेवा बजावताना आरोपीला मदत केल्याप्रकरणी झालं होतं निलंबन
मुंबईतील जे जे रुग्णालयात एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेंचं शवविच्छेदन सुरू, कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह सोपवणार, पोलीस खोटं बोलत असल्याचा कुटुंबियांचा आरोप
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, विदर्भ आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, रात्री ९ वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बैठक
अमित शाहांची नागपुरात आढावा बैठक, मात्र काश्मीरात प्रचारात व्यस्त असलेले नितीन गडकरी अनुपस्थित राहणार, चर्चांना उधाण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram