
ABP Majha Headlines : 12 PM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अटकपूर्व जामिनावर हायकोर्टात सुनावणी प्रलंबित असतानाच प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा, फोटो व्हायरल, कोलकातामार्गे दुबईला केल्याची शक्यता
हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलावली बैठक..हिंसाचारग्रस्त भागात उपाययोजनांसदर्भात करणार चर्चा
नागपूर हिंसाचारप्रकरणी आणखी दोघांना अटक, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे कार्याध्यक्ष हमीद इंजिनीअर आणि मोहम्मद खान यांना बेड्या, सोशल मीडियाद्वारे कट रचल्याचं समोर
नागपूर हिंसेनंतर काँग्रेसची सत्यशोधक समिती आज पाहणी करणार, आढावा घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अहवाल देणार तर पोलीस, प्रशासन, नागरिकांशी चर्चा करुन शांततेसाठी प्रयत्न
नागपूर हिंसाचारप्रकरणी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या फहीम खानचा जामीनासाठी अर्ज, आरोप खोटे असून जामीनावर सुटका करण्याची मागणी
नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी, आदित्य ठाकरेंचा संशय...तर हिंसाचाराला फडणवीस, शिंदे राजकीय संघर्षाची किनार, इम्तियाज जलील यांचा दावा...माझा महाराष्ट्र, माझं व्हिजनमध्ये मोठं वक्तव्य...
औरंगजेबाचा वाद इतक्या वर्षांनी उकरून काढण्याची गरज नाही, अजितदादांचा सरकारला घरचा अहेर...मंत्र्यांनी तारतम्य ठेवून बोलावं, माझा व्हिजनमध्ये बोलताना नितेश राणेंनाही सुनावले खडे बोल...
शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांकडून निरोप पाठवला होता, चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट...५६ वरच्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आणि सुषमा अंधारेंमध्ये जुंपली...
राज्यात ७० टक्के सीबीएसई तर ३० टक्के एसएससी अभ्यासक्रम, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य, भाषा विषयाशी तडजोड नाही
आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, अजिंक्य रहाणेच्या केकेआर आणि रजत पाटीदारच्या आरसीबीमध्ये सलामीची लढत, नव्या नियमांसह नव्या कर्णधारांवर नजरा