ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025

Continues below advertisement

७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन,  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन

Gondia Accident : गोंदियात बुलेरोची दुचाकीला मागून धडक, 5 महिन्यांच्या बाळासह तीन जणांचा दुर्दैवी अंत

((कर्तव्यपथावरील अवकाशात हवाई दलाच्या चित्तथरारक कवायती.. ))वायुसेनेच्या चाळीस लढाऊ विमानांची फ्लायपास्ट सलामी, राफेल विमानांचा व्हिक्टरी रोल, जग्वारचा अमृतकाल तर सुखोई पथकानेे साकारला त्रिशूल
कर्तव्यपथावर आज देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि शौर्याचं दर्शन.. निमलष्करी दलांच्या चित्तवेधक तर तिन्ही सैन्य दलाच्या रोमहर्षक कवायती 
कर्तव्य पथावर तिन्ही सैन्यदलांंकडून कवायतींसह शस्त्रसामर्थ्याचं प्रदर्शन.. वेगवेगळ्या विभागाच्या आणि राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथांनी वाढवली प्रजासत्ताक सोहळ्याची रंगत..
मरिन ड्राईव्ह ते वांद्रे, सुसाट प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न सत्यात, मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडचं उद्धाटन. फडणवीसांनी स्वतः विंटेज कार चालवून केली कोस्टलची सफर
तब्बल पाच तासांच्या विलंबानंतर कर्नाक पुलाचा गर्डर लाँच, पहाटे साडेपाचला संपणारा ब्लॉक सव्वा दहाला संपला, सीएसएमटीपर्यंत धीम्या गतीने लोकल आणि एक्स्प्रेस वाहतूक सुरु
गरीब असल्याने हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिलं. नरहरी झिरवाळांचं धक्कादायक वक्तव्य, मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विचारणार जाब, तर गिरीश महाजनांचेही खडेबोल
संभाजीनगरच्या मुख्य सोहळ्यातही राजकीय मानापमान आणि आरोप-प्रत्यारोप..  खासदार भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा चंद्रकांत खैरेंजवळ बसण्यास नकार, खैरेंचाही पलटवार
कर्णकर्कश व्हीआयपी सायरनसह बेदरकार गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरची पोलिसांनाच सस्पेंड करण्याची धमकी, संभाजीनगरच्या बेमुर्वतखोर बिल्डरवर अखेर अदखलपात्र गुन्हा.. 
टोरेस घोटाळ्यात व्हिसलब्लोअर असल्याचा दावा करणारा कंपनीचा सीईओ तौसिफ रियाझला अखेर बेड्या, घोटाळा उघडकीस आल्यापासून होता फरार
कंगनाचा इमर्जन्सी सिनेमा कोसळणं हीच इंदिरा गांधीची ताकद, संजय राऊतांचं रोखठोक टीका, साठ कोटींच्या इमर्जन्सीचा नऊ दिवसात फक्त पंधरा कोटींचा गल्ला..
महाराष्ट्रात गुलैन बॅरी सिन्ड्रोम आजाराचा पहिला बळी.. पुण्यातील GBS बाधित रुग्णाचा सोलापुरात मृत्यू, बाधित रुग्ण मूळ सोलापूरचाच असल्याची माहिती
जीबीएस बाधितांवर कमला नेहरु रुग्णालयात मोफत उपचार, पुणे महापालिका आयुक्तांची माहिती.. खाजगी रुग्णालयाच्या बिल आकारणीवरही ठेवणार लक्ष.. पुण्यात ७४ पैकी १४ जीबीएस बाधित व्हेटिंलेटरवर 
पालकमंत्रीपदाच्या स्थगितीनंतरही शासकीय आदेशानुसार नाशिक आणि रायगडमध्ये ध्वजवंदन.. नाशकात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि रायगडमध्ये महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंनी फटकावला तिरंगा 
गांधी विचारांचा गोडवा निर्माण करणाऱ्या लातूर जिल्ह्यातल्या उजेड गावात महात्मा गांधीजींची यात्रा.. १९५२ पासून सुरु आहे आगळी-वेगळी परंपरा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram