ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 10 AM 05 April 2025


दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने २७ कोटींचा मिळकतकर थकवला, सहा वर्षात एक रूपयाही कर भरला नाही, रूग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड

मंगेशकर रूग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता, आजही रूग्णालयाबाहेर आंदोलन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना....धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंशी चर्चा, राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट

धनंजय मुंडेंशी विवाह झाल्याचे फोटो, व्हिडीओ आज कोर्टाला देणार, करूणा मुंडेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, आज सुनावणी, लग्नाचं सर्टिफिकेट नसल्याचं केलं स्पष्ट

कॉमेडिअन कुणाल कामराला आज खार पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश, पोलिसांचं तिसरं समन्स, आजतरी कामरा उपस्थित राहतो का याची उत्सुकता

सैफच्या घरी आरोपी शरिफूलच्या हाताचे ठसे, पोलिसांची कोर्टात माहिती, आरोपीला जामीन दिल्यास बांगलादेशात पळून जाईल, पोलिसांचा कोर्टात दावा

बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच, महादेव गित्तेचा आरोप, कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गित्तेची तक्रार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola