ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 17 March 2025
छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीचं निमित्त साधून, औरंगजेब कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं आज राज्यभर आंदोलन, औरंगजेबाच्या कबरीजवळ कडेकोड सुरक्षा
औरंगजेबाची कबर हटवा, नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा...शिवजयंतीच्या मुहूर्तावर आजपासून औरंगजेबाची कबर हटाव मोहीम होणार सुरू...खुल्ताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ
शिवजयंती निमित्त भिवंडीकराचं जनतेच्या राजाला आगळं वेगळं अभिवादन.. मराडे पाड्यात छत्रपती शिवरायाच्या मंदिराचं मुख्यमंत्री फडणवीस करणार लोकार्पण..
औरंगजेबाचा मृत्यू झालेल्या अहिल्यानगरच्या भिंगारमध्येही विहिंप आणि बजरंग दलाचं आंदोलन.. कडेकोट पोलीस बंदोबस्त.. तर सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही निदर्शने
भाजप आमदार सुरेश धसांनी घेतली खोक्याच्या कुटुंबीयांची भेट..धसांसमोर खोक्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश तर
अनेक गुन्हे असणाऱ्या सतीश भोसलेचा धसांना एवढा पुळका का, सर्वसामान्यांचा सवाल..
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस, भाजपचे उमेदवार जाहीर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची उत्सुकता
शिंदे गटाकडून ऑफर, मात्र सेक्युलर भूमिकेचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीत जाणार, काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचं स्पष्टीकरण स्पष्टीकरण
बीड पुन्हा एकदा हत्येनं हादरलं, जबरमारहाणीत ट्रक चालकाला मृत्यू, बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा राजकारणाला सुरूवात
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानवर घणाघाती हल्ला.. अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रिडमनला खास मुलाखत.. पाकिस्तानने प्रत्येक शांतता प्रस्तावाचं उत्तर विश्वासघाताने दिल्याचा दावा..
जो करेगा जात की बात, उसको मारूंगा कसके लात, नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींचं रोखठोक मत, मुस्लिम समुदायालाही अब्दुल कलामांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला
पाकिस्तानात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर भीषण हल्ला, ९० जवान मारल्याचा दावा, आत्मघाती हल्ल्यानंतर लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर...
धाराशिवच्या भूम तालुक्यातील वाल्हा गावात तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्याकडून एकाला बेदम मारहाण, सावंतांच्या १४ ते १५ कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा रत्नदीप चव्हाण यांचा आरोप, याआधीही खोटे गुन्हे दाखल करून मारहाण केल्याचा चव्हाण यांचा आरोप.
नाशिकच्या कळवणमध्ये ग्रामसेवकाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, आमदार नितीन पवार पतीला सतत त्रास देत असल्याचा महिलेचा आरोप.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा इंग्लंडमध्येही निषेध, आरोपींच्या फोटोची होळी करत भारतीय महिलेने मागितला न्याय.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर, विविध विकास कामांचा घेणार आढावा, यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित असणार.