
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 24 March 2025
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू, अद्याप सत्ताधारी आणि विरोधक यांच्या २९३ प्रस्तावावर चर्चा बाकी, तर विरोधी पक्षनेते पदाबाबत अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होऊन देखील काहीच हालचाल नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज संभाजीनगर दौऱ्यावर, दिवंगत साहित्यिक रा.र.बोराडे तसेच सचिन मुळे यांच्या घरी सांत्वन भेट
तब्बल महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी, कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन फेटाळण्याला कोरटकरकडून हायकोर्टात आव्हान.
मुंबईत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंविरोधात गाणं.. खारमधील स्टुडिओची शिवसैनिकांकडून.. उत्तरादाखल घटनेची प्रत हाती धरुन कामराची नवी इन्स्टा पोस्ट..
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, खतगावकरांमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल, चिखलीकरांचा दावा,
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूची वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीने हटवण्याची संभाजीराजे छत्रपतींची मागणी. इतिहासात वाघ्याचा संदर्भ नसल्याचं म्हणत फडणवीसांना पत्र..
औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू...पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक... वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन..मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन
*अर्थसंकल्पीय अधिवेशन अंतिम टप्प्यात*
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू, २९३ प्रस्तावांवरील चर्चेचा पेच अद्याप कायम असून, या आठवड्यात त्यावर चर्चा होणार, तर विरोधक कायदा-सुव्यवस्था आणि विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार.
विधानसभा महत्वाच कामकाज -
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असून कामकाजाला अवघे तीन दिवस उरलेले आहेत. आज पासून अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात होणार आहे. या प्रस्तावावर आज दिवसभर चर्चा होईल. त्यानंतर मंगळवारी याच्यावरती रिप्लाय होणार आहे. या चर्चेदरम्यान विरोधक कायदा व सुव्यवस्था आणि इतर प्रश्नांवरती सरकारला धारेवरती धरणार आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचय्या संदर्भात सभागृहात सुधीर मुनगंटीवार आणि भाजपच्या इतर आमदारांनी मागणी केली होती. उद्या विधानसभेत हा ठराव मांडला जाणार आहे.
वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मानाचा पुरस्कार असलेला जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव उद्या विधानसभेमध्ये असणार आहे.
लक्षवेधीला मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहत नाही. अनेकदा कोरम पूर्ण न झाल्यामुळे सभागृहकूब करावा लागलं होतं. यावरती अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. मात्र त्यानंतरही लक्षवेधी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एवढ्या लक्षवेधी का घेतल्या जातात असा सूर अनेक मंत्र्यांचा पाहायला मिळतोय. उद्या पुन्हा 29 लक्षवेधी सभागृहात पार पडणार आहे
पहिल्या आठवड्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या २९३ प्रस्तावावर चर्चा बाकी आहे. यावेळी यावर चर्चा होणार आहे.