ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 16 March 2025
राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचे नाव आज जाहीर होण्याची शक्यता. दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर होणार बैठक.
औरंगजेबाची कबर हटवा, नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा...१७ मार्चला आंदोलन...तर खुल्ताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली...
औरंगजेबाच्या कबरीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर...कबर काढून फेकण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी...तर औरंगजेबाला कुठे गाडलं हे लोकांना कळायला हवं, विरोधकांचा सूर...
काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली, त्याचे बीडमध्ये दुष्परिणाम, शरद पवारांची बीडच्या परिस्थितीवरून टीका...बीडमधल्या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यात पवारांचाच हात, अंजली दमानियांचा हल्लाबोल...
खोक्याचं घर पाडायला सरकारनं घाई केली, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केली खंत, घर पाडलेल्या जागेला आज भेट देऊन कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार..
हार्बर, मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक..रूळ, सिग्नल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक..ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल धावणार..
मुंबई-गोवा महामार्गवरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर बंद राहणार, पाली-खोपोली-पुणे मार्गांवरील अवजड वाहतूकही बंद ठेवण्यात येणार.
संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या अमृत महोत्सवी सोहळ्यातील तुकाराम बीज कार्यक्रम आज पार पडणार, यंदाचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना
१ एप्रिलपासून राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. महामंडळाने सूचना जारी केल्याची माहिती.
मुंबई-गोवा महामार्गवरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर बंद राहणार, होळीसाठी आलेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय, पाली-खोपोली-पुणे मार्गांवरील अवजड वाहतूकही बंद ठेवण्यात येणार.
संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त होणा-या तुकाराम बीज कार्यक्रमासाठी दोन लाख पुरण पोळ्यांचे मांडे पाठवले. पुण्याच्या डोंगर पायथा येथे आजपासून सुरु होणार तुकाराम बीज कार्यक्रम.
नाशिक मनसे नेत्यांची मुंबईत राज ठाकरे यांच्यासोबत पार पडली बैठक. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याकडे दिले जाणार लक्ष. दिनकर पाटील यांची पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती.
साताऱ्यातील २०१७मधील नवीन मार्केट कमिटीचं प्रकरण निकाली, खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजेंनी सत्र न्यायालयात उपस्थिती, जागेच्या वादावरुन उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होते.