ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 26 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 26 February 2025
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार, नराधम दत्तात्रय गाडे फरार, आरोपीच्या भावाची चौकशी सुरु, मंगळवारी पहाटेची घटनेने पुणे हादरलं..
बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वारगेट स्थानकात डेपोची तोडफोड...वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन...
पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपच्या परिसरात पार्क केलेल्या जुन्या बसेसमध्ये सापडले साडी, शर्ट आणि कंडोम…बसस्थानक सुरक्षित नसल्याचं धक्कादायक चित्र समोर...ओएसडीच्या मुद्द्यावरून शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या रडारवर, भुमरेंनंतर सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोडांच्या ओएसडींवर अमोल मिटकरींचे आरोप,
आरोप झालेला ओएसडी चालत नाही, मग मंत्री कसा चालतो, सुप्रिया सुळेेंचा सरकारला सवाल...सरकार खरंच भ्रष्टाचारमुक्त असेल तर सिलेक्टिक वॉशिंग मशीन चालणार नसल्याचा टोला...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची निुयुक्ती, बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील...मस्साजोगकरांचं अन्नत्याग आंदोलन मागे...
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांची उपस्थिती, दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र गैरहजर
त्र्यंबकेश्वरमध्ये शिवस्तुती कार्यक्रमाला जाणार नसल्याचं प्राजक्ता माळीनं केलं स्पष्ट...वादामुळे प्रशासनावर ताण पडू नये म्हणून निर्णय...पण प्राजक्ता माळीची टीम करणार कार्यक्रम सादर..
देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी, महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंगांसह प्रमुख शिवमंदिरात दर्शनाची लगबग.. गावोगावच्या शिवमंदिरात रोषणाई..
नीलम गोऱ्हे जे बोलल्या ते खरं, उद्धव ठाकरेंची असंख्य बिलं शिंदेनी भागवली, नितेश राणेंचा दावा...उद्धव ठाकरेंना खुल्या व्यासपीठावर चर्चेसाठी येण्याचं दिलं आव्हान...