ABP Majha Headlines : दुुपारी 03 च्या हेडलाईन्स : 09 Aug 2024 : ABP Majha Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : दुुपारी 03 च्या हेडलाईन्स :  09 Aug 2024 : ABP Majha Marathi News

एससी, एसटी वर्गाला क्रिमीलेयर लागणार नाही अशी मोदींची एससी एसटीच्या खासदारांना हमी, सूत्रांची एबीपी माझाला माहिती, क्रिमीलेयर हा निकाल नाही तर टिप्पणी असल्याचंही मत व्यक्त

मुंबईतील आचार्य अँड मराठे कॉलेजनं लागू केलेल्या हिजाबबंदीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, बिंदी आणि टीकल्यांवरही बंदी आणली का, कोर्टाचा कॉलेजला सवाल 

 राज्यसभा खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात पुन्हा खडाजंगी, धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा ३ दिवसांचा महाराष्ट्र दौरा, १६,१७ आणि १८ ऑगस्टला शाह महाराष्ट्रात, भाजप पदाधिकाऱ्यांशी करणार विभागवार चर्चा

महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या जमिनींचा मोठा घोटाळा, काँग्रेसच्या नेत्यांनी जमिनी लाटल्याचा देवेंद्र फडणवीसांचा थेट आरोप, जमिनी जाणार म्हणून कायदा दुरुस्तीला विरोध असल्याचा आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram