ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 6PM 07 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 6PM 07 August 2024
भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का, कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र, निर्धारित वजनापेक्षा काही ग्राम वजन अधिक भरल्याने अपात्र घोषित
विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा भारताकडून तीव्र निषेध व्यक्त, लोकसभेत गदारोळानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांचं निवेदन
विनेश फोगाट अपात्र ठरण्यात षडयंत्र असल्याचा आरोप...विनेशच्या कुटुंबीयांनीही व्यक्त केला संशय...
विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्ष पी.टी. उषांशी चर्चा, तातडीने अपील करण्याचे पंतप्रधान मोदींचे निर्देश
सोलापुरातून मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर हल्लाबोल, भुजबळ ज्या नेत्याच्या प्रचारासाठी जातील त्या नेत्याला पाडा, जरांगेंची भुजबळांसह, राणेंवर टीका
काहीजण सत्तेसाठी पावसात भिजतात आपण जातीसाठी भिजू, मनोज जरांगेंचा शरद पवारांना टोला, तर अजित पवारांवरही नाव न घेता निशाणा