ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 11 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 11 April 2025
दीनानाथ रुग्णालय प्रकरणी पहिले दोन अहवाल आलेत, तिसरा अहवाल आला की कारवाई, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, पैशांसाठी गरिबांना अडवणं खपवून घेणार नाही, दादांची तंबी
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी, पटियाला कोर्टात एनआयकडून ई-मेलसह भक्कम पुरावे सादर.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतरचा पहिला फोटो समोर...यूएपीए कायद्यांतर्गत एनआयएकडून तहव्वूर राणाच्या अटकेची कारवाई
एसटी कर्मचाऱ्यांचा उरलेला ४४ टक्के पगार मंगळवारपर्यंत मिळणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश, ५६ टक्केच पगार झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांची झालीय अडचण
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवण्यात एकनाथ शिंदेंची बाजी, वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चेतून काढला तोडगा, महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्याआधी सरनाईकांनी टाळलं संकट
माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधाण, तर मंत्रिपद न मिळाल्याने खदखद व्यक्त करणाऱ्या मुनगंटीवारांच्या मुखी आता सरकार बदलाची भाषा..
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा.. नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार उपस्थित...संपूर्ण पवार कुटुंब एकाच फ्रेममध्ये