Kolhapur News : माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, कोल्हापूरच्या आरटीओकडून कारवाई सुरू
Continues below advertisement
कोल्हापूरमध्ये (Kolhapur) वाहनांच्या प्रखर दिव्यांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाची (RTO) मोठी कारवाई, ABP माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. 'वाहनांना अतिरिक्त प्रखर दिवे लावल्यामुळे समोरून येणाऱ्या चालकाला त्रास होतो आणि अपघातांना निमंत्रण मिळते', ही बाब एबीपी माझाने समोर आणल्यानंतर RTO ने कारवाई सुरू केली आहे. अधिकारी संजीव भोर (Sanjeev Bhor) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या पाच दिवसांत शेकडो वाहनांवर कारवाई करत सुमारे दोन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्देशांचे पालन करत ही कारवाई करण्यात येत असून, कंपनीने दिलेल्या दिव्यांव्यतिरिक्त अतिरिक्त लाईट्स लावणे बेकायदेशीर असल्याचे RTO ने स्पष्ट केले आहे. आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी या कारवाईचा आढावा घेतला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement