ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 AM : 30 July 2024 : Maharashtra News

उरण हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला उरण पोलिसांकडून अखेर बेड्या, लवकरच कर्नाटकातून नवी मुंबईत आणणार 

मिलिंद मोरे मृत्यू प्रकरणी विरारमधील सेवन सी रिसॉर्ट जमीनदोस्त, पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होतं तोडकाम 

पश्चिम रेल्वेच्या भाईंदर रेल्वे स्थानकावरील तांत्रिक बिघाड दुरुस्त, मात्र लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने, विरार स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  चर्चा  

मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योजक गौतम अदानी यांची रात्री वर्षा बंगल्यावर भेट, बैठकीत धारावी पुर्नविकासावर चर्चा झाल्याची माहिती 

मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज मातोश्रीवर जबाब दो आंदोलन, सोमवारी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट न झाल्याने ठोक मोर्चा आक्रमक 

विविध योजनांच्या जाहिरातींवर सरकार २७० कोटी ५ लाख रुपये खर्च करणार, महायुती सरकारचा शासन निर्णय जारी, खर्च लाडक्या खुर्चीसाठी, विजय वडेट्टीवारांची टीका 

राजू शेट्टींनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये दीड तास संवाद, सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची शेट्टींची माहिती 

मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात हजर न झाल्याने IAS पूजा खेडकरांना कार्मिक विभागाची नोटीस,२ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola