ABP Majha Headlines 9AM | एबीपी माझा हेडलाईन्स 9 AM | 23 July 2024
मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार, आयकर रचना बदलणार का ? याची उत्कंठा...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळणार ? रेल्वे मार्ग, नव्या गाड्या, पायाभूत सुविधांसाठी निधीची अपेक्षा..
शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता, शेतकरी आणि ग्रामीण विकासावर भर राहतो की शहरंच बजेटचा केंद्रबिंदू राहणार याकडं लक्ष
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ५० नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची शक्यता, एमएमआर रिजनमध्ये सहा नव्या टर्मिनसचीही भेट राहण्याचा अंदाज..
महागाई कमी करा, शेतकऱ्यांच्या आधारभूत किंमतीसाठी काही तरी करा, विकास दर १६ ते १७ टक्क्यांपर्यंत न्या...महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटलांनी वाचून दाखवली अपेक्षांची यादी...
देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानावरील भाजपच्या बैठकीत आरक्षणावर चर्चा, विधानसभेला आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळावा याचं नियोजन झाल्याची माहिती
राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निकालाकडे दोन्ही गटातील आमदारांचं लक्ष