
ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha
हत्येच्या दिवशी केज पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिसांना फाशी द्या, देशमुख कटुंबीयांची सुप्रिया सुळेंकडे मागणी.. कृष्णा आंधळेला २५ तारखेपर्यंत न पकडल्यास अन्नत्याग करण्याचा इशारा
मस्साजोग प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेसह गृहमंत्री अमित शाहांना भेटल्याची सुप्रिया सुळेंची माहिती, मस्साजोग प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनाही भेटणार
शिवसेना नेते आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात.. वाय दर्जाची सुरक्षा असलेले आमदार सुरक्षा घटवल्याने संतप्त.. दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता..
फक्त शिवसेनाच नाही तर भाजपच्याही माजी मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्याचं स्पष्टीकरण, सुरक्षा कपात करण्यापूर्वी जीविताला धोका नसल्याची खात्री केल्याची सुत्रांची माहिती
मराठवाड्यात अनेक शहरात पाणीपुरवठ्याचे तीन तेरा.. संभाजीनगरमध्ये सात दिवसांतून एकदा तर बीडमध्ये एकवीस दिवसातून एकदा नळाला पाणी.. संभाजीनगरच्या समांतर पाईपलाईनची पंधरा वर्षापासून प्रतीक्षा
तुळजापुरात अडीच वर्षांपासून ड्रग्जची तस्करी, तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा, दीड हजारांहून अधिक तरूण विळख्यात अडकल्याची भीती, पुजारी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार