ABP Majha Headlines 02 PM | एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM | 31 July 2024
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान पूजा खेडकरांनी बारा वेळा परीक्षा दिल्याची वकिलांची कबुली, लैंगिक छळाची तक्रार केल्यानंतरच षडयंत्र रचल्याचा बचाव
मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील यांचा देवगिरीवर जाणारा मोर्चा चौपाटीवरच अडवला, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत करणार होते विचारणा
उरण यशश्री शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी, काल रात्रीच पनवेल कोर्टात केलं हजर
आमदार मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हे दाखल, आतापर्यंत 3 जणांना अटक, मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळेसह १० आरोपी फरार
मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आरोपी मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच जबाबदार असल्याचा जय मालोकारच्या कुटुंबीयांचा आरोप
अजित पवारांना बनावट कागदपत्रांद्वारे सोडण्यासाठी सीआरपीएफला अमित शाहांच्या सूचना होत्या, संजय राऊत यांचा थेट आरोप, अजित डोवाल यांचाही कटात सहभाग, राऊतांचं वक्तव्य
ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची आज मुंबईत विधानसभेच्या पार्श्नभूमीवर बैठक, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
भाजपचे प्रभारी, सहप्रभारी आणि राष्ट्रीय संघटन मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा असल्याची माहिती.