
ABP Majha Headlines 10AM | एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM | 02 August 2024
पूजा खेडकरने IAS होण्यासाठी सात वेगवेगळी नांव धारण केली, दिल्ली पोलिसांची न्यायालयाला माहिती
पूजा खेडकर अजूनही पोलिसांच्या हाताबाहेर, दिल्ली पोलीस मागावर, पूजा महाराष्ट्राबाहेर लपल्याची शक्यता...
ईडीकडून माझ्यावर धाडी टाकण्याच्या हालचाली, राहुल गांधींचा गौप्यस्फोट, माझं चक्रव्यूहाचं भाषण बहुधा 'टू इन वन' लाआवडलं नाही असं ट्विट..
मनोज जरांगे आज पुणे न्यायालयात हजर राहणार, २०१३ मध्ये नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल.
मराठा समाज मागासच, मागासवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडण्याला काही अडचण नाही अशीही शिफारस
प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये ५० टक्के ओबीसी उमेदवार असावेत, अन्यथा ओबीसी कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन.
सांगलीत ११ ऑगस्टला ओबीसींचा भव्य मेळावा, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे उपस्थित राहणार अशी प्रकाश शेंडगे यांची माहिती...