ABP Majha Headlines : सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : 25 July 2024 : ABP Majha Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : 25 July 2024 : ABP Majha Marathi News

मुंबई शहर उपनगरांमध्ये जोरदार पाऊस... पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, ठाणे, कल्याण डोंबिवलीतही पाऊस
पुण्यात अतिवृष्टी... खडकवासल्यातून ४० हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग ... शाळांना सुट्टी जाहीर..तर आवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना सूचना
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा आज मेळावा... सर्व विधानसभा जागांची चाचपणी करणार
वंचित बहुजन आघाडीची आजपासून आरक्षण बचाओ यात्रा, मुंबईतील चैत्यभूमीवरुन यात्रेला सुरुवात तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ७ ऑगस्टला समारोप
अजित पवार, ठाकरेंना खोट्या आरोपात गोवण्यासाठी दबाव टाकला, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे फडणवीसांवर आरोप...तर देशमुखांच्या अनेक वादग्रस्त क्लिप माझ्याकडे, वेळेवर बाहेर काढेन, फडणवीसांचा इशारा...
गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी आपल्याला अनेकदा धमकावलं होतं, जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांची सीबीआयसमोर कबुली, तर आरोपांवर बोलण्यास देशमुखांचा नकार
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वादावर फडणवीस आणि अजित पवारांची बैठक... अधिवेशनादरम्यानही दिसून आला होता समन्वयाचा अभाव...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram