ABP Majha Headlines 10 PM TOP Headlines 26 May 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स
ABP Majha Headlines 10 PM TOP Headlines 26 May 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स
बारामतीत पाच दिवसात ३१४ मिमी पाऊस, पिंपळीत नीरा डावा कालवा फुटला, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरग्रस्त भागांची पाहणी,कांदा पिकाच्या नुकसानीचाही घेतला आढावा...
मुंबईत पुढच्या तीन-चार तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, उपनगरांसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज, ताशी ५० ते ६० किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता
मश्जिद बंदर परिसरात रेल्वेच्या रूळांवर प्रचंड पाणी...कोस्टल रोड परिसरातही मुसळधार पाऊस...तर पश्चिम दुतग्रती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी...वाहतूक संथगतीने सुरू...
पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेवर काहीसा परिणाम, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ मिनिटं उशिराने, हार्बर मार्गावरील लोकलवरही परिणाम..
सोलापूरच्या नीरा नरसिंगपूर भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर पाण्याचं आक्राळविक्राळ रूप...मुसळधार पावसामुळे संगम नगर भागात १२ ते १५ घरांत शिरलं नीरा नदीचं पाणी...
सातारा जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग...कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो...तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळाचा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी...