ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 1 PM 08 October 2024
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 1 PM 08 October 2024
हरियाणात सुरुवातीच्या पिछाडीनंतर भाजपची आगेकूच, कलांमध्ये ४९ जागांवर आघाडी तर काँग्रेस ३५ ठिकाणी आघाडीवर
हरियाणातील ११ जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर तरी अपडेट नाही, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
हरियाणामध्ये जुलाना मतदारसंघातून पैलवान विनेश फोगाट आघाडीवर... तर उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या आई हिस्सारमधून आघाडीवर
हरियाणात भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली... भाजपकडून १०० किलो जिलेबीची ऑर्डर...तर संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान पोहोचणार
जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीची मुसंडी, बहुमताचा टप्पा पार, भाजपला २८ जागांवर आघाडी
माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींची मुलगी इल्तिजा बिजबेहरा मतदारसंघात पिछाडीवर....जनतेचा कौल मान्य करुन पीडीपी कार्यकर्त्यांचे आभार मानणारी एक्स पोस्ट
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला दोन्ही मतदारसंघात आघाडीवर, बडगाम आणि गांदरबलमधून निर्णायक आघाडी