ABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 17 July 2024 Marathi News

ABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 17 July 2024 Marathi News

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, शहाराध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आज पक्षप्रवेश

ठाकरे गटाकडून विधानसभेच्या १२० पेक्षा जास्त जागांचा आढावा, मविआमध्ये समसमान वाटप झाल्यास ठाकरे गट ९० ते १०० जागांवर उमेदवार देण्याची शक्यता

सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगाकडून दखल, अहमदनगर मतदारसंघातील आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्राचं होणार मॉकपोल

अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडीला आव्हान, नागपूर खंडपीठात याचिका दाखल, निवडणुकीत विजयासाठी भ्रष्ट मार्ग अवलंबल्याचा आरोप

लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना, बारावी पास केल्यावर मिळणार सहा हजार, डिप्लोमावाल्यांना आठ तर पदवीधरांना १० हजार स्टायपेंडची घोषणा

काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात शूर जवान शहीद, गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्या, खासदार संजय राऊतांची मागणी

कर्नाटकात खासगी कंपन्यात क आणि ड पदांसाठी भूमिपुत्रांना १०० टक्के आरक्षण, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, विधिमंडळात गुरुवारी विधेयक

खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डद्वारे पूजा खेडेकरांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र, रहिवासी म्हणून दिला थर्मोव्हेरीटा कंपनीचा पत्ता 

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांच प्रशिक्षण स्थगित...तातडीने मसुरीला परत जाण्याचे आदेश.. एबीपी माझाच्या बातमी आणि पाठपुराव्याचा दणका..

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola