ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईही सज्ज, संध्याकाळी नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक, सर्वसामान्यांनाही सहभागी होता येणार
विश्वविजेत्या टीम इंडियाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, मोदी आणि खेळाडूंमध्ये दीड तास संवाद, पंतप्रधानांच्या निवासस्थानी संघाचा सत्कार
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईला रवाना, दुपारी चार वाजता मुंबईत दाखल होणार
टीम इंडियाचे चार मुंबईकर क्रिकेटपटू उद्या घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट, रोहित, सूर्यकुमार,
जयस्वाल आणि शिवम दुबेचा अध्यक्षांच्या दालनात सत्कार
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन पाच दिवसांऐवजी तीन दिवसांवर...उद्यापासून सभागृहात जाता येणार
पुण्यातील माजी मनसे नेते वसंत मोरे ९ जुलै रोजी ठाकरे गटात प्रवेश करणार, मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईतल्या हजारो कोटींच्या जागा अदानींच्या घशात घातल्याचा विजय वडेट्टीवारांचा घणाघाती आरोप, जागा देण्याला विरोध करणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली का केली असा सरकारला सवाल..