ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024

Continues below advertisement

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदेंची अमित शाहांसोबत १५ मिनिटं खलबतं, जागावाटपाच्या सूत्रावर प्राथमिक चर्चा, अंतिम निर्णय मुंबईत घेणार

पुण्यात विद्यमान भाजप आमदारांसमोर पक्षातील माजी नगरसेवकांचं आव्हान.. तिकीट जाहीर होण्याआधीच इच्छुकांकडून प्रचाराचा श्रीगणेशा.. 

जालन्यात काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर..इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा

चिंचवड आपल्याकडे घ्या नाहीतर मविआत जाऊ.. समर्थकांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांकडून मनधरणी.. जागा राष्ट्रवादीला मागण्याचं दिलं आश्वासन... 

शरद पवार अजित पवारांना लवकरच  नवीन धक्का देणार, रामराजेंच्या पक्षप्रवेशाचे खुद्द शरद पवारांकडूनच संकेत, १४ तारखेला फलटण दौरा

लोकसभेत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची उमेदवारी जाहीर, आज कुटुंबासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घेताच इंदापूरमधल्या काही नेत्यांचे नाराजीचे सूर, लवकरच मेळावा घेऊन निर्णय जाहीर करणार,समजूत काढण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram