ABP Majha Headlines : 11 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य
मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचं कडक बंदोबस्त
मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासून आयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती.