ABP Majha Headlines : 08 PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही, आमदार सुनील शेळकेंना पवारांचा इशारा, तर शरद पवारांनी पुरावा द्यावा, सुनील शेळकेंचं आव्हान

सुनील शेळकेंना सत्तेचा अहंकार, पवारांना आव्हान देण्याची त्यांची लायकी नाही, पवार गटाचे मदन बाफना यांची टीका तर सुनील शेळकेंचा धमकीचा व्हिडीओही समोर

२०४७ साली भारत विकसित होईल पण तोपर्यंत इथल्या गरीब शेतकऱ्यांनी वाट पाहायची का, त्याला आज काय देणार सांगा, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर घणाघात

रावसाहेब दानवेंच्या खिशात भाजप उमेदवारांची यादी..पत्रकारांना दाखवला कालच्या बैठकीतला कागद..धुळे, नाशिक,पालघर इत्यादी जागांचा दानवेंकडून उल्लेख

महायुतीच्या जागावाटपात मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता, शिंदे - अजित पवारांचे काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता 

लोकसभेच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी, केसाने गळा कापू नका, विश्वासघात करू नका, राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा

रामदास कदमांना टोकाची वक्तव्य करण्याची सवय.. भाजपचा मुख्यमंत्री शिंदेंना पूर्ण पाठिंबा, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया तर महायुतीत केवळ दोन ते तीन जागांवरून किरकोळ मतभिन्नता, फडणवीसांचं विधान

राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर, पाथर्डी नाका परिसरात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत, उद्या काळाराम मंदिरात घेणार दर्शन

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावरचा दावा राष्ट्रवादीने सोडलेला नाही, युती धर्मानुसार निर्णय घ्या, प्रफुल पटेलांचा महायुतीला इशारा

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी ८ एप्रिलला पुढील सुनावणी, अध्यक्षांपुढील सुनावणीतली मूळ कागदपत्रं सुप्रीम कोर्टाने मागवली

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कमध्ये होणार, सभेला राज्य सरकारची परवानगी, १७ मार्चला सभा 

राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल, ९००० मेगावॉटच्या कामाची वर्क ऑर्डर, २०२५ पर्यंत ४० टक्के कृषी फिडर सौर उर्जेवर, हुडकोसोबत सामंजस्य करार

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram