ABP Majha Headlines : 02PM : 19 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP HEADLINES:
सगेसोयऱ्यांबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, अन्यथा त्यांना मराठाविरोधी समजलं जाईल, मनोज जरांगेंचा इशारा, आंदोलनाबाबत २१ तारखेला ठरवू, जरांगेंचं स्पष्टीकरण
'निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, मी अपवाद कसा असेन?' उदयनराजेंकडून सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त.
शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा
नाशिक खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात, गोडसे थोडक्यात बचावले, गाडीचं मोठं नुकसान
ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर. एकूण १८ मतदारसंघात निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या. तर ठाकरे गट १८ जागा लढणार असल्याची निश्चिती.
छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४वी जयंती, किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोतस्व सोहळा
आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आममध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा घुमणार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी शिवजयंती सोहळा
पंढरपूरमध्ये माघी यात्रेसाठी चार लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल, दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत.