ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 10 July 2024

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना, नांदेड तर विदर्भातील वाशिममध्ये भूकंपाचे धक्के, ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने नागरिक भयभीत

कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यात पाणी भरल्याने वाहतूक पुन्हा बंद, मुंबईतून सुटणाऱ्या काही गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग बदलले

मुंबईनंतर पुण्यातही सीएनजीच्या दरांमध्ये वाढ, प्रतिकिलो दीड रुपयांनी सीएनजी महागला,पुण्यात सीएनजीचा भाव आता ८५ रुपये

मराठवाड्यात काल आठही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, आतापर्यंत २८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, मराठवाड्यात यंदाच्या पाऊसबळींचा आकडा २६ वर..

मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ
नेत्यांना भेटण्याची शक्यता, कृषी कार्यक्रमासाठी
मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा

विरोधी पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्री लिहिणार पत्र, राज्यातील मराठा, ओबीसी आरक्षणासंदर्भात पक्षाची भूमिका लेखी कळवण्याची मागणी करणार

सगेसोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर...कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवण्याचीही मागणी...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola