ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 30 July 2024 : Maharashtra News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक, उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने मराठा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, मराठा क्रांती ठोक मोर्चा आज मातोश्रीवर आंदोलन करणार
राज्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू, ५ आवडत्या कंत्रादारांना मदतनिधी दिला जातोय, रस्ते घोटाळ्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
विविध योजनांच्या जाहिरातींवर सरकार २७० कोटी ५ लाख रुपये खर्च करणार, महायुती सरकारचा शासन निर्णय जारी, खर्च लाडक्या खुर्चीसाठी, विजय वडेट्टीवारांची टीका
राजू शेट्टींनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये दीड तास संवाद, सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची शेट्टींची माहिती
उरण हत्याकांड प्रकरणी मोठी माहिती समोर, २५ जुलैच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपी दाऊद शेख करत होता तरुणीचा पाठलाग
मिलिंद मोरे मृत्यू प्रकरणी विरारमधील सेवन सी रिसॉर्ट जमीनदोस्त, पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होतं तोडकाम