ABP Majha Headlines : सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : 29 Aug 2024 : ABP Majha Marathi News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : 29 Aug 2024 : ABP Majha Marathi News
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारमध्ये हालचाली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, फडणवीस आणि अजित पवारांसह नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार.
पुतळा कोसळण्याविरोधात अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार.
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक...येत्या रविवारी गेट वे ऑफ इंडियावर धडक...शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडे मारो आंदोलन
पुतळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी, अजित पवार गट उद्या राज्यभर मूक आंदोलन करणार
पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटलांविरोधात गुन्हा दाखल...गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही बेपत्ता...पुतळ्याच्या कामाशी संबंध नसल्याचा चेतन पाटलांचा दावा..
लोकसभेप्रमाणे विधानसभेत ही काॅग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा अंतर्गत सर्व्हे
सरकारवर दबावासाठी तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी...येत्या पंधरा दिवसांत घोषणा, बच्चू कडूंची माहिती...संभाजीराजे छत्रपती, राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा सुरू...