ABP Majha Headlines : सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : 1 Sep 2024 : ABP Majha Marathi News
ABP Majha Headlines : सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : 1 Sep 2024 : ABP Majha Marathi News
भाजपनं दीडशे जागांचा आग्रह धरल्यानं महायुतीचं जागावाटप रखडलं...अजित पवार ६० जागांसाठी तयार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, रामगिरीवर शिंदे, फडणवीस अजित पवारांची बैठक
मोदींनी माफी मागितली तरी आजच्या जोडे मारो आंदोलनावर महाविकास आघाडी ठाम..मविआच्या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी नाही...तर महायुती आंदोलनातूनच मविआला उत्तर देणार
तानाजी सावंतांनंतर भाजपच्या नेत्याचा राष्ट्रवादीवर हल्ला, असंगाशी संग झाला, गणेश हाकेंचं वक्तव्य...तर आपले कार्यकर्तेही बोलू शकतात, अजितदादांचा इशारा...
तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांचं समन्स, राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत बोलावल्याची माहिती...राष्ट्रवादीच्या नेत्यांची सावंतांवर आगपाखड..
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात निलंगा कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट...१६ वर्षांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बसची तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी गुन्हा होता दाखल...
पुण्यात कॅन्सर हॉस्पिटलसाठी प्रस्तावित असलेली पाचशे कोटींची जागा खासगी बिल्डरला अवघ्या साठ कोटीत देण्याचा डाव...रस्ते विकास महामंडळाच्या निर्णयाला सार्वजनिक बांधकाम विभागाचा विरोध...