ABP Majha Headlines 12PM एबीपी माझा हेडलाईन्स 12PM 26 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 12PM एबीपी माझा हेडलाईन्स  12PM 26 July 2024 Marathi News

सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार, संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाटांना देणार आव्हान..

काही पक्ष महाराष्ट्रविरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेत, संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका, भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिन्याभरात स्वबळाची भाषा कशी असा सवाल..

भाजपचा राजीनामा दिलेले गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे आज ठाकरे गटात प्रवेश करणार, २०१४ पर्यंत होते शिवसेनेमध्येच..

शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव, ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी तातडीने सुनावणीची मागणी, अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान

पुण्यातली पूरस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळंच, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आरोप, पूर्वसूचना न देताच खडकवासला धरणातून पाणी का सोडलं असा सवाल..

पुण्यात आज पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून विसर्ग घटला, पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड

मुंबईच्या ७ धरणांमधला पाणीसाठा ७१ टक्क्यांवर, दोन दिवसांतच १३ टक्के वाढ..वैतरणावरच्या तीन प्रकल्पांतही ७१ टक्के पाणीसाठा..

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट, दोन महिन्यानंतरही धरणांमध्ये १४ टक्केच पाणीसाठा, पिकांपुरता पाऊस होत असल्यानं पिकं जोमदार...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram