ABP Majha Headlines 9AM एबीपी माझा हेडलाईन्स 09 AM 11 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 9AM एबीपी माझा हेडलाईन्स 09 AM 11 July 2024 Marathi News
विधानपरिषद सभापतीपदावर भाजप, शिवसेना,राष्ट्रवादीचा दावा, भाजपनं शब्द दिलाय,राष्ट्रवादीचा युक्तिवाद तर गोऱ्हेंना बढती देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न, भाजपकडून राम शिंदेंसह अनेक जण उत्सुक..
मतांचा कोटा ठरवण्यासंदर्भात आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक, काँग्रेसमधल्या तीन मतांसह अपक्षांची दोन मते सोबत असल्याचा विश्वास
विधान परिषद निवडणुकीची रणनीती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठरणार... भाजप, राष्ट्रवादी, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम...
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक गैरहजर राहिल्यामुळे सत्ताधारी आजही आक्रमक होण्याची शक्यता, विरोधकांनी लेखी भूमिका कळवावी, सत्ताधाऱ्यांची ठाम मागणी
मराठा आंदोलन उधळण्याचा सरकारचा डाव, समाजातल्या काही अतृप्त आत्म्यांना सरकारची फूस, एबीपी माझाच्या झीरो अवर कार्यक्रमात मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
नागपूरच्या मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळा, तीन वर्षात तब्बल २ लाख २७ हजार नावं गायब, फोटो नाहीत म्हणून वगळली १ लाख ९४ हजार नावं..
समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगर जवळच्या माळीवाड्यात भेगा,३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीचे तडे, २० वर्षे खड्डे पडणार नसल्याचा एमएसआरडीसीचा दावा फोल...