ABP Majha Headlines : 6:30 AM : 9 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  6:30  AM : 9 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

महायुतीच्या जागावाटपाबाबत दिल्लीत बैठक, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अमित शाहांची चर्चा, मुंबईतल्या जागा भाजपसाठी सोडण्यास शिवसेना तयार, सूत्रांची माहिती 
जागावाटपावरुन महायुतीत वाद, कमी जागा वाट्याला येणार म्हणून अजित गटात नाराजीचा सूर, एबीपी माझाला सूत्रांची माहिती
नाशिकमध्ये आज मनसेचा १८ वा वर्धापनदिन,राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल. राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांच लक्ष. 
वंचितला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता, पाच जागा देण्याला पवार आणि ठाकरे सहमत, तर तीनच जागा द्याव्यात असं संजय राऊत आणि नाना पटोलेंचं मत
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई 
सुप्रिया सुळेंनी घेतली सुनेत्रा पवारांची गळाभेट, बारामतीजवळच्या एका मंदिरात दोघींची भेट 
बँक कर्मचाऱ्यांना १७ टक्के पगारवाढ मिळणार, २०२२ पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार पगारवाढ, ८ लाख कर्मचाऱ्यांना लाभ
रोहित आणि गिलच्या शतकांमुळे धरमशाला कसोटीत भारताची २५५ धावांची आघाडी, पडिक्कल, सरफराजचीही अर्धशतकं, इंग्लिश गोलंदाजीचा ऐन थंडीत निघाला घामटा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram