
ABP Majha Headlines : 12 PM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 PM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
बेळगावात पुन्हा एकदा कन्नडिगांच्या दडपशाहीचा प्रकार समोर आला आहे. मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बेळगावमध्ये सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटकच्या राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समिती हा महामेळावा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कोल्हापुरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उद्या बेळगावकडे जाणार आहेत. मात्र, नेहमीप्रमाणे या सगळ्यांना कर्नाटक पोलिसांकडून सीमेवरच अडवले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे कर्नाटक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे यावर आता महाराष्ट्रातील नेते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागले. उद्याच्या बेळगाव्यातील या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेमके कोणते नेते उपस्थिती लावणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.