ABP Majha Headlines : 8 PM : 9 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 PM : 9 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
सर्व घटकपक्षांचा मान राखला जाईल, अमित शाहांचं शिंदे आणि अजित पवारांना आश्वासन...जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा दिल्लीत...विमानतळावरच्या बैठकीत शाहांचा महायुतीला विजयाचा कानमंत्र...
अमित शाहांच्या मुुंबई दौऱ्यात चर्चा अजितदादांची...दौऱ्यात अनेक ठिकाणी अजितदादांच्या अनुपस्थितीमुळे लक्ष वेधलं...शेवटच्या क्षणी मुंबई विमानतळावर भेट...
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर साकारण्यात आलेल्या योजनांच्या देखाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब, पुन्हा एकदा श्रेयवादाच्या चर्चेला तोंड
शरद पवारांनी जावई आणि नातीसह घेतलं लालबागचा राजा आणि चिंतामणीचं दर्शन...हा तर ढोंगीपणा, प्रवीण दरेकरांची टीका...
प्रकाश आंबेडकरांकडून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न... तर मनोज जरांगे पाटलांबरोबर जाणाऱ्या नेत्यांसोबत आम्ही जाणार नाही, आंबेडकरांनी केलं स्पष्ट
फडणवीस साहेब तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटणार नाही, बीडमधील घोंगडी बैठकीत मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल