ABP Majha Headlines : 8 PM : 20 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 8 PM : 20 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
३४ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंच्या बंगल्यात सलमान खानचा मुक्काम, शुटिंगसाठी महाबळेश्वरला आलेला सलमान वाधवानच्या बंगल्यात.
विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला १०० जागा द्या, महायुतीत जागावाटपात जे घडलं ते घृणास्पद होतं, रामदास कदमांनी भाजपला सुनावलं, ठाकरेंच्या २१ जागांवरही बोट
जागावाटपाच्या वेळी भाजपने शिवसेनेची दिशाभूल केली, शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकरांचा आरोप, रामदास कदमांच्या मताशी सहमत असल्याचं वक्तव्य...
अजित पवारांच्या महायुतीतल्या समावेशावरून रामदास कदमांची उघड नाराजी....तर अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली, मिटकरींचा हल्लाबोल...
सरकारचं शिष्टमंडळ उद्या लक्ष्मण हाकेंना भेटणार...उदय सामंत, अतुल सावे गोपीचंद पडळकरांचा शिष्टमंडळात समावेश...ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हाकेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस...
मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या... शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना...तर केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नसल्याच्याही कानपिचक्या